Company Name: | Citizen First |
Category: | Other |
Year of Est.: | 2022 |
Nature of Business: | Insurance & Financial Services, Bada Business, Multi Services |
सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना व व्यावसायिकांना विविध नागरी सेवा एकाच छताखाली मिळणार आहे. यामध्ये भारतातल्या विविध विमा कंपन्यांचे विमा उत्पादने जसे जीवन विमा, वाहन विमा, आरोग्य विमा, प्रवास विमा इत्यादी सर्व प्रकारच्या विमा सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. सिटीजन फर्स्टचे वैशिष्ट्य आहे की, नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व क्षमतेनुसार विमा घेण्याचा पर्याय सिटीजन फर्स्ट सेवा केंद्र उपलब्ध करून देणार आहे.
सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून लवकरच कुटुंब सुरक्षा अभियान राबविले जाणार असून कुटुंबातील सर्व सदस्यांना विमा संरक्षण देऊन त्यांच्या भविष्याचे नियोजन, निवृत्तीचे नियोजन, मुलांचे संगोपन व सुरक्षा, मुलांचे शिक्षण व विवाहासाठीचे नियोजन, कर नियोजन, वाहनांची सुरक्षा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन व प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे, सोबतच सदर कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आवश्यक कागदपत्रे पडताळून ते दुरुस्त करण्यासाठी प्रत्यक्ष मदत सिटीजन फर्स्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सदर व्यवसायातून होणाऱ्या नफ्याचा मोठा हिस्सा दिव्यांग बांधवांसाठी, बेवारस मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी तसेच युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे.